Monday, February 25, 2013

नैराश्य- Depression

क्षणाचा दुरावा क्षणाचीच भीती,
मनाच्या तळाशी अंधार राती;
वैराणवाटा निःशब्द नाती,
मनाच्या तळाशी रुजे रुक्ष माती;
विसावा न कोठे उसासे उराशी,
मनाच्या रिकाम्या काळोख गर्भी;

गेल्या काही दिवसांपासून Depression किंवा नैराश्य का येते हा विषयावरचे बरेच वाचन केले. सर्वसामान्य पठडीत न बसणारा विषय खरं तर आपल्या आयुष्याचा एक भाग झाला आहे हेच बहुतेकांना मान्य नाही. नैराश्याची तीव्रता जास्त वा कमी पण आपण प्रत्येक जण कधी न कधी त्याचे शिकार होतो. मी एक सर्वसामान्य स्त्री आहे म्हणजे चांगल्या भावना घेऊन दिवसाची सुरुवात करते पण जसा जसा दिवस पुढे सरकतो तशी तशी मी त्याला सामोरी जाते. हे तसं तसं सामोरं जाणं माझ्या बदलणाऱ्या अंतरंगाचं प्रतिबिंब असतं. सर्वसाधारणपणे आपण आपल्या भावनांना अवर घालू शकतो पण जे घालू शकत नाहीत ते वेगळ्या रीतीने व्यक्त होतात आणि मला वाटतं कि हे जे वेगळेपण आहे त्यात तर नैराश्याची सुरुवात नसेल? Denial, म्हणजे मला काहीच झालं नाही आणि मी अगदी नॉर्मल आहे असं भासवण्याचा आटापिटा करणारे Depression च्या वाटेवर चालत असतात का? मला ह्या नैराश्याचं गूढ खूप लहानपणा पासून आहे. आजचा दिवस चांगला वाटत असताना अचानक मनावर मळभ कसं दाटून येतं? विशिष्ट घटनांशी आपल्या भावना जोडल्या गेलेल्या असतात, मग आपण ज्या निराशावादी खुणा असतात त्यांना टाळू लागतो आणि माझा अनुभव असा आहे कि जितकं आपण टाळतो तितक्या त्या खुणा जास्त भेडसावतात.माझा माझ्या मनाचा शोध चालूच आहे परंतु ह्या शोधात मी हरवून तर चालले नाही न अशी भीती वाटू लागली आहे!

2 comments:

  1. छान रेवती. निराश प्रत्येकजण होतोच पण त्याची तीव्रता वाढलेली समजत नसावी माणसाला जी नैराश्याच्या वाटेवर घेऊन जाते.
    माझी आई नेहमी म्हणायची, "कुढत बसू नको जे असेल ते बोलून मोकळं व्हावं." माणूस जितकं स्वत:च्या भावना कोंडतो त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने नंतर त्याचा उद्रेक होतो.

    ReplyDelete
    Replies
    1. मोहना, हे नैराश्य आहे नं ते खरं तर आतल्या आत कुढत बसण्याचं नाही आहे. कारण बोलून प्रश्न सुटतात ते जर समोरचा पण त्या समजुतीचा असेल तर. हे मात्र बरोबर कि जिथे बोलून भागात असेल तिथे माणसानं बोलून टाकावंच! मी सध्या एका वेगळ्याच मानसिकतेचा विचार करते आहे, पुढच्या लेखात लिहीतेच आहे. पण तुझ्या मतासाठी धन्यवाद :)

      Delete